मुंबई : ‘प्रेश्नम’नं भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची त्रैमासिक मान्यता रेटिंग सुरू केली आहे. यासाठी पहिल्या फेरीत त्यांनी १३ राज्यांची निवड केली होती. या राज्यांत भारतातील ६७% लोकसंख्या आहे. यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षालाही मिळतात”, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
या सर्वेक्षणानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक रेटिंग मिळालं असून, सर्वेक्षणात जवळपास ४९% मतदारांनी, उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. वर उल्लेखलेल्या १३ राज्यांतील जवळपास १७,५०० मतदारांचं सर्वेक्षण करुन ‘प्रेश्नम’नं हा निष्कर्ष काढला आहे.
उद्धव ठाकरे : १३ राज्यांच्या सर्वेक्षणातून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
दरम्यान, यावर आता इतर नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, “आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे. नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?,” अशा शब्दांत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
शरद पवारांनी स्पष्ट करावं की, ते नक्की कोणत्या पदाचे उमेदवार आहेत – सुधीर मुनगंटीवार
तसेच, “आता जनतेला वेठीस धरून, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. निर्बंध का उठवत नाही? दुकानं बंद, रेल्वे बंद, लोक घरात, वेठीस धरण्याचं काम होतंय, सरकारला परिणाम भोगावे लागणार, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचंय,” असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला. , अशी टीकाही देशपांडेंनी केली.
Read Also :
- बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, पाहूया ताकद – फडणवीसांच चॅलेंज
- आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील – विनायक मेटे
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?