पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये टिका टिप्पणी जोरदार सुरू झाली आहे. राहुल गांधी जर सावरकर चित्रपट बघायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“आधी प्रचार करणार नाही म्हणाले, अन् आज थेट पेढे घेऊन दानवे खैरेंच्या घरी,” एकच चर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेवर प्रत्युत्तर देतांना नाना पटोले म्हणाले की, मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला आहे. नितीन गडकरी यांच्यावरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला आहे. गोडसेवरील चित्रपट प्लॉप झाला आणि सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, गांदी विचारासाठी फडणवीस यांनी हा चित्रपट पाहायला हवा. त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो असा टोला फडणवीसांना लगावला.
हेही वाचा…“पवार घराण्याने नेहमी झोडा आणि तोडा भूमिका घेतलीय”, पण आता..,” यशवंत ब्रिगेडने बारामतीत दोन्ही पवारांना दिलं आव्हान
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीस यांना डिवचलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा संपुर्ण खर्च मी करतो. हॉटेलचा खर्च करतो, पण त्यांनी मणिपुर, लडाख, अरूणाचल प्रदेशमध्ये जाऊन यावं, त्यांचा सर्व खर्च करायला मी तयार आहे. एखादा चित्रपट निर्माता घेऊन फडणवीस यांनी मणिपुर फाईल्स चित्रपट काढावा. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार”, तुम्ही इंडिया आघाडीला निवडा,” उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढत अटळ, कॉंग्रेस अन् भाजपमध्ये वंचित ठरणार गेम चेंजर ?
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० तोफा धडाडणार ! लोकसभेसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
हेही वाचा…कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?
हेही वाचा…हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीला जोर, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध