पुणे : पुण्यातील अत्यंत चर्चेत आलेल्या चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याआधी पुण्यातील अंतर्गत श्रेयवादाच्या लढाईवरून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं नाही. तसेच निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी यावरून चंद्रकांत पाटलांवर जहरी टिका केल्याने पुण्यातील भाजपचं राजकारण आता चव्हाट्यावर आलं आहे. त्याचबरोबर त्यांना पुण्यातील केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला देखील पास दिला नसल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा…हुंडाईंची महाराष्ट्रात 5000 कोटींची गुंतवणुक, रोहित पवारांनी राज्य सराकराला दिला ‘हा’ सल्ला
मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून सर्व ठिकाणी चे पास होते. परंतु राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही पास देण्यात आला नाही. साधे कोथरूड च्या मंडला अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ठ श्रेणीमध्ये अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. असं म्हणत त्यांनी यावरूनही नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“हवामान खराब, तरीही शिंदेंचा हॅलिकॉप्टरने प्रवास,” जितेंद्र आव्हाडांचा दावा, केली भावनिक पोस्ट
दरम्यान, देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण