अमरावती : यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी या शिंदे गटात गेल्यानंतर आज त्यांनी वाशीम शहरात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याला जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेची न्यायालयीन लढाई आम्हीच जिंकू असं शिंदे गटातील खासदार भावना गवळी म्हणाल्या.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
आजचं हे शक्तिप्रदर्शन आहे, असं मी म्हणत नाही. गेल्या 24 ते 25 वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे. या मतदारसंघातुन खासदार म्हणुन पाच वेळा निवडून आली आहे. हे जनतेचं प्रेम, जिव्हाळा आहे. हा मेळावा म्हणजे शिंदे-भाजप युतीचं एकत्रीकरण आहे. जनतेचं काम झालं पाहिजे. या दृष्टीकोनातुन हा मेळावा होता. राज्यात युती सरकार जनतेची कामे करण्यास सक्षम आहे, असं भावना गवळी म्हणाल्या.
“शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
नरेंद्र मोदी यांना बांधलेल्या राखीचा विपरीत अर्थ कोणी काढु नये. असं केलं म्हणुन म्हणुन मंत्रिपद भेटतं असं काही नसतं. मला एवढच सांगायचं आहे, राखी बांधली या पवित्र नात्याला कोणी गालबोट लावु नये. अनेक वर्षापासुन त्यांना राखी बांधत आहे. एक खासदार आहे, त्यांची भगिणी म्हणुन माझं अनेक वर्षापासुनचं त्याच्याशी नातं आहे, असं खासदार भावना गवळी म्हणाल्या.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
जिल्ह्यातील भाजप आमदारांचे आणि शिवसेनेचे जुळत नव्हते. मात्र शिंदे गट आणि भाजप आमदारांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम तुम्ही करताय का असा प्रश्न विचारला असता भावना गवळी म्हणाल्या की, पटत नाही असं आपण म्हणु शकत नाही. माझं लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी काम केलं आहे. त्यांच्या मतदारसंघातुन मला बहुमत मिळालं आहे. त्यांच्या सोबतच होतो आणि यांच्या सोबतच आहे, असं खासदार भावना गवळी म्हणाल्या.
Read also
- “सोन्याची अंडी देणारी कोंबडी, शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षांपासून गिळली”
- “दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
- “माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
- “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात