अकोला : मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची 25 वर्षे सत्ता होती. त्यांनी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे हे समजल. शिवसेनेने पंचवीस वर्षे मुंबई गिळली आहे. मुंबईकरांच्या हाती काय दिलं. पंचवीस वर्षात मुंबईकरांसाठी काय केलं याचं पहिले उत्तर द्या, असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला केला आहे.
“शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचे कडवट विचारांचे ते कर्यकर्ते आहेत. बाळासाहेबांनी मुंबईच्या ज्या संकल्पना होत्या. त्याच शिंदे-फडणवीस सरकारच्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती, परंपरा अशा प्रकारचे टोमणे, मत्सरानं बोलणं अलीकडे वाढत आहे. हे राजकारणाला शोभा देणार नाही. त्यामुळे ते वैफिल्याने एवढे ग्रासले आहेत. म्हणुन रोज अशा प्रकारचे बोलतात, अशी टिका ही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
आत्ताचे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार सरकार आहे. यापूर्वीच सरकार हे अफजल खानाच्या विचाराचं सरकार होतं. तशी त्या सरकारची मनोवृत्ती होती. छत्रपतीच्या बाबतीत देखाव्याला मान्यता द्यायला हरकत नाही. अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केली आहे त्याप्रकारे ते निर्णय घेतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
“सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
दृष्टी तशी सृष्टी दिसते त्यामुळे चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे. खेळाचा दर्जा देण्याची गरज असेल तर त्यांनाही दिला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अतिवृष्टीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांनी मदत जाहीर केली. वेगवेगळ्या घोषणा केली. विरोधकांकडे चांगल्या सूचना असतील, त्याही स्वीकारल्या जातील अन्यथा विरोधक त्याचं काम करतील, असही प्रवीण दरेकर म्हणाले.
Read also
- “दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
- “माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
- “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग