मुंबई : शिवसेना पक्ष कुणाचा अन् आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच दिला. निकाल राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दोन्ही गटातील कोणत्याही आमदारांना अपात्र न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला. याचा जल्लोष शिंदे गटाकडून करण्यात आला. तर ठाकरे गटाने निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यातच आज उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार असून यात काय असणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषद झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची देखील पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
हेही वाचा…“मी मटण खातो; मटण, म्हणजेच मांसाहार करतो”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांवर पलटवार
उद्धव ठाकरे यांची आज दुपारी ४ वाजता महापत्रकार परिषद होणार आहे. मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे होणाऱ्या या महापत्रकार परिषदेला जनता न्यायालय असं नाव देण्यात आलं आहे. यातच ठाकरे यांच्यासोबत कायदेतज्ञ अॅड असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयातच वकिल रोहित शर्मा हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत काही ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक सर्व सामान्य जनता आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरेंच्या नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील पत्रकार परिषदेतून उत्तर देणार आहेत. पाच वाजता विधान भवनात राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
हेही वाचा…ना नामदेव ना रामदास..! चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी, जुना वाद, अन् काढला काटा
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना अपात्र आमदार याचिकांवर निकाल दिला आहे. यात महत्वाचं म्हणजे नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील कोणत्याही आमदारांना अपात्र केलं नाही. तसेच खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकरांचा निकाल कसा चुकीचा आहे. तसेच निकालाच्या सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू याविषयी या पत्रकार परिषदेत चर्चा केल्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सोलापूरात शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात दाखल होणार
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना मिळाली रश्मी ठाकरेंची ताकद, शिंदे गटाला धुळ चारण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात
हेही वाचा…“आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे अन् काही तरी..,”सरकारच्या पडद्यामागील हालचालींबाबत जरांगे पाटलांची साशंकता
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, कोण कोण असणार ? उत्सुकता शिगेला पोहचली
हेही वाचा…” राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची खुलेआम लूट”, दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंची जोरदार टिका