बीड : राज्यात पहिल्यांदाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे निवडणुकीत एकत्र आलेत. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बंधू-भगिंनी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ खासदार प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने चर्चांना उधान आलं.
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी
वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण २१ जागांसाठी निवडणुक होत आहे. या निवडणुकीत एकूण ११ जागा ह्या पंकजा मुंडे गटाकडे तर १० जागा राष्ट्रवादीकडे म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे असणार आहे. या निवडणुकीत यापुर्वी ज्या नेत्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशा सगळ्या उमेदवारांना दोन्ही बहीण-भाऊ बाजूला ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठई ५० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीच्या अर्जांची आज छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची मुदत ही १ जुनपर्यंत असून ११ जुनला २१ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १२ जूनला मतमोजणी केली जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश