मुंबई : राज्यात पुढच्या महिन्यात राजकीय सभांचा धुमधडाका उडणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष निकाल, कर्नाटक विधानसभा निकालानंतर आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या सर्वांचा परिणाम राजकीय सभांवर होण्याची शक्यता आहे. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जाहीर सभा होणार आहेत.
हेही वाचा…“न शिकलेल्या माणसाला समजू शकतं, मग ‘नार्वेकर’ तर सुप्रिद्ध घराण्यातले वकील”, आव्हाडांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. यातच आता आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याने शिंदे-फडणवीस यांच्यात धाकधुक वाढली आहे. यातच आता शिवसेनेचा 19 जून रोजी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्याआधी उद्धव ठाकरे मुंबईत एक भव्य मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात ठाकरे आपल्या ठाकरे शैलीत काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…भाजपच्या ४ आमदारांकडून मंत्रीपदासाठी पावणे दोन कोटींची मागणी, जे.पी.नड्डा यांचे स्वीय सहायक म्हणून…
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा देखील १० जुन रोजी वर्धापन दिवस असून राष्ट्रवादीची नगर मध्ये जाहीर सभा होणार आहे. त्याआधी आज राष्ट्रवादीची मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत रणनीती आखण्यात आली. तर ठाकरेंनी देखील जिल्ह्याप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकांनंतर आता राज्यातील पुढील महिन्यातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?