IMPIMP
Name of Ajit Pawar MLA in Pune car accident case Name of Ajit Pawar MLA in Pune car accident case

पुणे कार अपघात प्रकरणात अजित पवार गटाच्या आमदाराचं नाव समोर, आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आता ससुन रूग्णालयात दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपी याच्या ब्लड सॅम्पलमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशातच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  डॉ. अजय तावरे याच्या ससून रुग्णालयात नियुक्तीसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस पत्र दिल्याचे दिसून आले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोठं भाष्य केलं आहे.

हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ? 

पुण्यात घडलेल्या अग्रवाल प्रकरणात रोजच नव्या बाबी समोर येत आहेत. एका मोठ्या बापाच्या मुलाला वाचवायला कित्येक अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपल इमान त्या रात्री विकले, हे समजून घेताना अक्षरशः मनाचा संताप होतोय. आरोपीचे ब्लड सँपल डॉ.अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर यांनी चक्क कचऱ्यात फेकले. त्याऐवजी दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचे ब्लड सँपल या लोकांनी पोलिसांना दिले. इतकंच नाही तर याचा रिपोर्ट द्यायला 4-5 दिवसांचा वेळ लावला. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल” 

एरव्ही 2 तासात मिळणारे सँपल रीपोर्टला इतका वेळ का लागत असावा..? असा सवाल करत बाकी या डॉक्टरांना ससून हॉस्पिटलची पोस्टिंग मिळावी. यासाठी अपघात झाला. त्यादिवशी जातीने लक्ष घालणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता, अशी देखील माहिती समोर येत आहे. हा तोच डॉक्टर आहे.  जो ललित पाटील ड्रग्स प्रकरणात देखील संशयाच्या छायेखाली होता. पुणे पोलिस, ससूनचे डॉक्टर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे मिळून एका बड्या बापाच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.आणि तर जितके प्रयत्न करत आहेत.  तितकेच अजून जनते समोर नागडे होत आहेत.हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा आणि चीड आणणारा आहे. असंही त्यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा..“भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला…”, भुजबळांच्या ८० ते ९० जागांच्या दाव्यांवर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले.. 

हेही वाचा…“निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये, अन् पराभावाने खचूनही जाऊ नका” 

हेही वाचा…“मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या,” पुणे अपघात प्रकरणी अजित पवार असं का म्हणाले ? 

हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार 

हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार