नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित केलेल्या मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जसंदर्भात भाजपसह शिंदे गटावर गंभीर आरोप केले. ड्रग्जप्रकरणात भूमिका घेतल्यानंतर माझ्याशी मांडवली करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या अमन परदेशी याचा नाव घेतलं होतं. त्यावर आता सुषमा अंधारे यांचं आरोप तथ्यहीन असून त्यांच्याविरोधात अब्रुनुसानिचा दावा ठोकणार असा इशारा अमन परदेशी यांनी घेतला आहे.
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आरोपात तथ्य नाही. मी अंधारे यांच्याशी कधीही बोललो अथवा संपर्क केलेला नाही, अंधारे यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून माझे नाव खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तथ्यही आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असं अमन परदेशी यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?
दहा दिवसांपासून नोटीस पाठवणारे मला अंधारात ठेऊन सेटलमेंटची भाषा करत आहेत. नाशिकचा अमन परदेशी पुण्याच्या एकीला फोन करतो. त्यांतर पुण्यातील नलिनी वायळला फोन करते. अन् पुण्यातीलच गोगावले माझ्यापर्यंत पोहचते. असं म्हणत माझ्यावर दबाव आणून घाबरवले जात आहे. असंही त्यांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत