मुंबई – भोंगावाद आणि हनुमान चालिसा प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तुरुंगात अडकले होते. ते सध्या जामिनावर सुटले आहेत. तुरुंगात असताना पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणा दांपत्याने केला होता. नवनीत राणांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले होते. आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे धाव घेतली आहे.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला यानंतर त्यांनी आता थेट दिल्लीकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने अन्याय केला असून, लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले आहेत आणि आता ते पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांना भेटणार आहेत.
“बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
नवनीत राणा म्हणाल्या की, मी आणि माझे पती रवी राणा हे आज दिल्लीत जात आहोत. आम्ही पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. आम्हाला तुरुंगात कशा प्रकारची वागणूक मिळाली, याची माहिती आम्ही त्यांना देऊ. मी याची तक्रार करणार आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तत्वांबद्दल बोलू नये आणि आम्हाला शिकवू नये.
“मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
दरम्यान, न्यायालयानं जामीन देताना राणा दांपत्याला माध्यमांशी न बोलण्याची अट घातली आहे. या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामिनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. माध्यमांशी न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आज सकाळी मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Read also:
- राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
- संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार