मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावरून दोन तासात हटवल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मी पुन्हा येईल, राष्ट्रनिर्मितीसाठी अशा आशायाचा फडणवीसांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. पंरतु काही काळानंतर तो लगेचच हटवला. त्या पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा येईनचा व्हिडीओ पोस्ट केला होता. जो पुढच्या तासाभरात डिलीट करण्यात आला. जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला तो डिलीट केला गेला. याचाच अर्थ मी पुन्हा येणार नसल्याचं हे संकेत आहेत. एक बाशिंग बांधून दोन जण तयार आहेत. यांची सत्ता येणार नाही. तरीही हे नवरदेव होऊन बसले आहेत. असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं
आत्ताचं सरकार हे अध्यक्षांच्या भरवशावर सुरू आहे. २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. तसंच जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला तो सहज नव्हता. आतमध्ये काहीतरी शिजतं असल्याचंही वडेट्टीवरांनी सांगितलं
एखाद्याला यायचं असेल तर तो व्हिडीओ टाकून येणार का? किती हा वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. परंतु मी पुन्हा सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पुर्ण दिवस करतील. अन् ते मुख्यमंत्री असतांना त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एखादा व्हिडीओ असा पडला तसा पडला असं निरिक्षण नोंदवणं चुकीचं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“किती हा वेडेपणा, काहीतरी डोकं ठिकाणावर आहे का”, ‘त्या’ व्हिडीओबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“६ हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला, पण कामे तशीच”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरवापसी, आज होणार पक्षप्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली”, फडणवीसांचा तो व्हिडीओ अन् शिंदे गटाने दिलं उत्तर
हेही वाचा…“समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू”, मराठा आमदारांनी दिला सरकारला कडक इशारा