IMPIMP
People's desire that I should be MP again, Khair expressed his desire to contest Lok Sabha again People's desire that I should be MP again, Khair expressed his desire to contest Lok Sabha again

“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येण्यास सुरूवात झालं आहे. यातच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गटातील दोन्ही नेत्यांमध्ये गटबाजी समोर आली आहे. पक्षांनी आदेश दिला निवडणूक लढविणार अशी इच्छा अंबादास दानवे यांनी व्यक्त करून दाखवली आहे. तर जनता पुन्हा मला मत देणार असं माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणताहेत.

हेही वाचा..नागपुरात सुनील केदारांभोवती भाजचपचं चक्रव्युह ; आणखी एका प्रकरणात धक्का देण्याच्या तयारीत 

मागच्या वेळी जी चुक झाली ती आता पुन्हा होणार नाही. जनतेसाठी आणि पक्षासाठी निवडणूक लढवणार असं म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जागा वाटपावर एकमत होण्याची गरज आहे. मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. राज्यसभा लोकसभआ खासदार यांच्या पेक्षा माझा काम आवडलं. आत्ताच्या खासदारावर लोक नाराज आहेत. आम्ही त्याचा वचपा काढणार असं म्हणत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावरही निशाणा साधला आहे.

हेही वाचा…“८०० कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार “, महायुतीत ठिणगी, अजित पवारांवर भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांचा

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन्हीही नेते निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत दानवे आणि खैरे यांच्या अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी कुणाला उमेदवारी देणार? यातच चंद्रकांत खैरे यांचा पत्ता कट होणार की अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळणार?  असा सवाल निर्माण झालाय.

READ ALSO :

हेही वाचाअजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद 

हेही वाचा…“काकांच्या सवालीत वाढलेल्या अजित पवारांमध्ये बराच फरक”, अजित पवारांना आव्हाडांनी चांगलचं सुनावलं 

हेही वाचा…एकाने आमदारकीसाठी तर दुसऱ्याने खासदारकीसाठी पक्षाला ठोकला रामराम..! पवार अन् संजोग वाघेरेंमुळे ठाकरेंना मिळालं बळ 

हेही वाचा.“गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला कडक इशारा 

हेही वाचा“भारत न्याय यात्रा तुम्हाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न दाखवणार”, यशोमती ठाकूर यांचं विधान