पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना आज (सोमवारी) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तर महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एका ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. १८) अटक केली होती.
वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना एसीबीने बुधवारी (दि. १८) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातील गुरुवारी (दि. १९) दोन दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा शनिवारी या पाच जणांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
कोल्हापूरकरांचा उर भरुन आला; शहिदाच्या बहिणीकडे राखी बांधायला आमदार भाऊ आला !
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र ऍड. नितीन लांडगे यांच्यामार्फत घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली. यावर न्यायालयाने गुरुवार (दि. २६) ऑगस्टपर्यंत लांडगे यांना अंतरिम जामीन दिला आहे. उर्वरित चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Read Also :
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट
- देगलूर पोटनिवडणुकीची मोर्चेबांधणी : काँग्रेसच्या बैठकीला अर्धाडझन मंत्र्यांची उपस्थिती
- नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना
- म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
- “सामनाचे नाव बदलून आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे,” भाजपचा घणाघात