पुणे : विशेष प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एक बडा नेता भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पिंपरी चिंचवड मधील एका बड्या नेत्याने त्यांची सदिच्छा भेट घेतली. शिरूर लोकसभा मतदारसंघातील हा बडा नेता असून, लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील आणि संबंधित नेत्याची बैठक झाली असून त्यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक व मोजके प्रभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
“सभा घेण्यासाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात”; शिंदे गटाच्या आमदारांचा सवाल
चंद्रकांत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका यांच्यासह शहरातील विकास कामाबाबत सविस्तर चर्चा झाली असून राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा मुहूर्त शोधण्याची तयारी सुरू झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये संघटनात्मक बदल केल्यानंतर पक्षांतर्गत दुफळी उफाळून आली. विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास ज्येष्ठांना “अनकम्फर्टेबल” वाटत आहे. त्यामुळे ज्येष्ठ विरुद्ध विद्यमान पदाधिकारी असा छुपा संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे.
“संभाजी भिडेंनाही आपल्या सारखं व्यक्तिस्वातंत्र्य”; टिकली प्रकरणावर कडूंची प्रतिक्रिया
दुसरीकडे राष्ट्रवादीतील पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात महत्त्वाचा “रोल” असलेले राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणामुळे नाराजी वाढली असून, मानपान नाट्यामध्ये राष्ट्रवादीतील दुफळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या चिंतन शिबिरामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अनुपस्थित असल्यामुळे अगोदरच राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. आता शिरूर मधील बडा नेता भाजपच्या गळाला लागल्यास निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
“मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार
दरम्यान, भोसरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सुद्धा आज चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यासोबत विलास लांडे हे देखील राष्ट्रवादीवर नाराज आहेत का ? अशी चर्चा देखील शहरात रंगली आहे. येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवडमधील काही नगरसेवकांचा गट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुत्रांकडून समोर आली आहे.
Read also
- राष्ट्रवादीचा खासदार भाजपच्या वाटेवर..! राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
- “२०२४ ची निवडणूक येईपर्यंत काॅंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील”; भाजप नेत्याचा दावा
- गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा.! “तब्ब्येत ठिक नसूनही शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित, अन् त्याचवेळी अजित पवार गायब”
- “तुमच्यातील योद्धा उद्या…;” हाताला पट्टी बांधून शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात
- “खैरेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे”; शिवसेना अन् काॅंग्रेसमध्ये वाद सुरू