जळगाव : सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. या सभांमधून त्या बंडखोर आमदारांवर तुटून पडताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जळगाव येथील एका सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यातच आता सुषमा अंधारे ह्या प्रत्येक सभेला पेट्या घेतात. असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला आहे.
“सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर
सुषमा अंधारे या स्व: ताची प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आम्ही श्रीराम प्रभुला मानतो. कालपर्यंत हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांना आता साक्षात्कार कसा झाला? असा सवाल शिंदे गटातील बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात ? तुम्हाला प्रत्येक सभेसाठी किती पेट्या मिळतात याची महाराष्ट्रभर चर्चा आहे. सभेसाठी पेट्या घ्यायच्या आणि सभा करायच्या अशी चर्चा राज्यात आहे. असंही ते म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
पक्ष वाढवण्यासाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या. आमच्यासाठी कोणी मुंबईहून आला नव्हता. आम्ही घरावर तुळशीपत्रं ठेऊन पक्ष वाढवला. आधीच आमच्यावर विरोधक टिका करत आहेत. आता आणखी एक विरोधक जोडला गेला. सुषमा अंधारे यांच्यामुळे नीलम गोऱ्हे यांना बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न आहे. तीन महिन्यापुर्वी पक्षात आलेली बाई प्रत्येक स्टेजवर जाऊन कशा प्रकारे वक्तव्य करत आहे. नीलम गोऱ्हे पक्षात आहेत हे लक्षात असू द्या. असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके
दरम्यान, सुषमा अंधारे यांची जळगाव दौऱ्याव महाप्रबोधन सभांचा आयोजन कऱण्यात आलं आहे. या सभांमधून अंधारे बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यातच अलिकडील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. अन् त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यावरून एकनाथ शिंदे सुषमा अंधारे यांना घाबरलेत का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता.
Read also
- “संभाजी भिडेंनाही आपल्या सारखं व्यक्तिस्वातंत्र्य”; टिकली प्रकरणावर कडूंची प्रतिक्रिया
- “मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार
- “नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं
- “सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?
- शिंदे गटाचे 12 आमदार बाद होणार..! सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांची रणनीती, काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले..?