नांदेड : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमधून हिंगोली जिल्ह्यात जात आहे. या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी लहान मुलांशी संवाद साधला होता. यावेळी त्या लहान मुलाने राहुल गांधी यांच्याकडे सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण त्याने कधी संगणक पाहिला नव्हता. त्यानंतर त्या मुलाला काही वेळातच राहुल गांधी यांनी संगणक दिला. याचं कौतुक राज्यातील नेते करीत आहेत.
“तर मग जितेंद्र आव्हाडांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं”; मनसेने डिवचलं
नांदेड येथे राहणाऱ्या सर्वेश हाटणे याने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. यावेळी त्याने राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर पायी चालत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी त्याला विचारले असता, मला भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचं आहे, परंतु मी याआधी कधीही कॉम्प्युटर बघितला नाही. असं सर्वेश हाटणे राहुल गांधी यांना म्हणला होता.
“हा माझ्या भावावर अन्याय आहे..;” सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण
यानंतर काॅंग्रेसचे नवे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्याला संगणक भेट दिला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटत होते. राहुल गांधी आणि सर्वेश हाटणे यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यावर राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर सातत्याने काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीवर टिका करणाऱे मनसेचे नेते गजानन काळे देखील भावुक झाले.
“अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड
दरम्यान गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणेला परिस्थितीमुले कॉम्फ्युटर सुद्धा पाहता आला नाही. हे लक्षात ठेऊन त्याला राहुल गांधी यांनी आज कॉम्प्युटर भेट दिला. राजकारण चालत राहील पण ही संवेदनशीलता कायम राहिल अशीच राहो. असं त्यांनी म्हटलं आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणेला परिस्थितीमुळे कॉम्प्युटर सुध्दा पाहता आला नाही हे लक्षात ठेवून त्याला राहुल गांधी यांनी आज कॉम्प्युटर भेट दिला …
राजकारण चालत राहील पण ही संवेदनशीलता कायम अशीच राहो … #RahulGandhi ❤️🙏 pic.twitter.com/hCBnYFZhQB
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 11, 2022
Read also
- हिवाळी अधिवेशनात ठाकरेंना धक्का देणार..! 8 जिल्हाप्रमुख अन् काॅंग्रेसचे माजी आमदार शिंदे गटात?
- गडकरी, तुमणेंसह 10 खासदारांचे राजीनामे घेणार..! विदर्भ आंदोलन समिती आक्रमक
- “भाजपचे 7 मंंत्री, 15 आमदार-खासदार तुरूंगात जातील”; राऊत तुरूंगातून बाहेर येताच शिवसेनेचा इशारा
- “संजय राऊत विद्वान आहेत, त्यांना तुरूंगवास भोगावा लागला, वाईट वाटतं..;” दिपक केसरकर
- राहुल गांधींना राष्ट्रवादीची साथ..! भारत जोडो यात्रेत सुळे, जयंत पाटील अन् आव्हांडाची हजेरी