मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय असलेले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, काल फेसबुक लाइव्ह आणि दूर दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला असून, एक मोठी घोषणा केली. यामध्ये त्यांनी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही अनेक सूचना केल्या आहेत.
“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
यात त्यांनी, “वैयक्तीक कामासाठी मी सामाजिक आणि पक्षाच्या राजकीय, दैनंदिन कामकाजातून ३ महिन्यांसाठी दूर राहणार आहे. पण असे असले, तरी पक्ष चालला पाहिजे. आपण ज्या आंदोलनाची सुरुवात केली आहे, ते सुरु राहिले पाहिजे. ५ जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच निर्णय प्रक्रियेसाठी पक्षाला अध्यक्ष असला पाहिजे.
अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी
त्यामुळे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून, महाराष्ट्र कमिटी त्यांना सहकार्य करेल”, असे आंबडेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर, राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली असल्याचे वृत्त असून, त्यामुळेच ते ३ महिने विश्रांती घेणार आहेत.
आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली. ८ जुलैला त्यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली असून, ते सध्या ICU मध्ये आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आणि विद्यमान प्रभारी रेखा ठाकूर यांनी फेसबुक पेजवरून सांगितले आहे.
मेडिकल बुलेटिन –
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. pic.twitter.com/lNGvyVZF3R
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 9, 2021
Read Also :
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
- काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
- पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!
- राऊतांच्या चमकोगिरीचा आणि सामनाच्या संपादकाचा काय संबंध? याचा खुलासा द्यावा – चित्रा वाघ