मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.
“पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”, संजय राऊत यांची शिवगर्जना
चित्रा वाघ यांनी ट्विट करून त्यांनी हा इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे?, याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.
संजयजी राऊत काल मा. @smritiirani बद्दल जे बरळलात…
मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे??
ते सांगा
मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन… @rautsanjay61 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/zvGvofjChi— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 9, 2021
“हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा”, चित्रा वाघ यांचा इशारा
राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची मोठी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असं कधी नव्हे ते तुम्ही खरे बोललात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला लगावतानाच असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
बचावाला येणाऱ्यांनाचं पोलिसांनी बसवून ठेवलयं, मारेकरी अद्याप मोकाट; चित्रा वाघ संतापल्या
दरम्यान, पालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखराल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचे आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. बरोबर आहे ते, असं राऊत म्हणाले होते.
Read Also :
- सहकार क्षेत्रात केंद्राची ढवळाढवळ; मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार?
- अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
- ‘राम’भक्त मोदींनी नव्या मंत्र्यांना घालून दिली ‘लक्ष्मण’रेषा, या ३ तत्त्वांच्या पलीकडे जाल तर, खबरदार!
- मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
- आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष