दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या काही महिन्यांत नाना पटोले, हे विधानसभा अध्यक्ष होते. मात्र, कालांतराने त्यांनी ही खुर्ची सोडली आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अंगावर घेतली. तेव्हापासून राज्याच्या विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात, अध्यक्षपदाची निवडणूक होऊन हे पद दिले जाईल, असे अंदाज बांधण्यात येत होते. मात्र, ती आशा फोल ठरली.
जावयाला समोर बसवून खडसेंची, ईडीकडून ९ तास मॅरेथॉन चौकशी; काय घडले, वाचा सविस्तर
दरम्यान, आता याबाबतीत नवीन घडामोड समोर येत असून, विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचं उघड झालं आहे. हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. मात्र, अजूनही त्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आता, या मुद्द्यावरून महसूल मंत्री आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत, ऊर्जामंत्री नितीन राऊत, हे दिल्लीत राहुल गांधी आणि इतर पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत, पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले असल्याची चर्चा आहे. त्यांची भेट घेऊन, पटोले यांची ते तक्रार करणार असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे, तर दुसरीकडे या भेटीला जाऊन एका वादाची किनार आहे. नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना, खनिकर्म महामंडळातील घोटाळ्याबाबत एक पत्र लिहिलं होतं. यात, या खात्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, त्यामुळे देखील राऊत-पटोले यांच्यात शीत संघर्ष सुरू आहे.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
काल नागपूरमध्ये नाना पटोले यांनी, केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आणि महागाई विरोधात सायकल आंदोलन केले. यावेळी देखील त्यांच्यासोबत नागपूरचे पालकमंत्री असलेले नितीन राऊत उपस्थित नव्हते, याची देखील काल राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे, एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे.
Read Also :
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!
- राऊतांच्या चमकोगिरीचा आणि सामनाच्या संपादकाचा काय संबंध? याचा खुलासा द्यावा – चित्रा वाघ
- सहकार क्षेत्रात केंद्राची ढवळाढवळ; मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार?
- अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
- पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी