मुंबई : शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आपल्या जाहीर सभांमधून शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडत आहेत. अनेकदा सुषमा अंधारे शिंदे गटातील नेत्यांवर कडाडून टिका करतांना दिसत आहेत. त्याला शिंदे गटाच्या आमदारांकडूनही सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाठी यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर आता रूपाली पाटील यांनी संजय शिरसाठ यांना काही प्रश्न केले आहेत.
हेही वाचा…““फडणवीसांच्या खासगी निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, आरोपी ताब्यात, कारण आलं समोर”
संभाजीनगर मध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला संजय शिरसाट का बर अडकवू पाहत होते ? या पाटीलचा काय संबंध होता म्हणून संजय शिरसाट हे आपली सगळी ताकद पणाला लावत होते? असा सवाल रूपाली पाटील यांनी केला आहे. तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, व्हाया सुरत गुवाहाटी टूर करणाऱ्या संजय शिरसाटाकडे 72 कोटी रुपयांची रक्कम घरी कशी काय आली ? या ७२ कोटी रुपयांतून शिरसाठ यांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी त्यांच्या जीवाभावाची बाई कोण होती? असा खोचक सवालही रूपाली पाटील यांनी शिरसाठ यांना केला आहे.
हेही वाचा…संजय शिरसाठ यांच्याविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार, म्हणाल्या की, “संजय शिरसाठ या विकृत आमदाराने..”
अगदी आठच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये ७२व्या मजल्यावर संजय शिरसाटानी कुणासाठी कोट्यावधीचा फ्लॅट घेतला ज्याची त्यांनी सत्यनारायण पूजा करण्यासाठी काही पत्रकारांनाही आमंत्रित केले होते. दोन अडीच महिन्यापूर्वी संजय शिरसाट यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने एअर ॲम्बुलन्स ने संभाजीनगर वरून मुंबईला नेण्याचे फार मोठे नाटक झाले हे अटॅक प्रकरण नेमके काय होते ? असाही सवाल त्यांनी केला.
Read also
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ते विधान, त्यावर कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर म्हणाले, “माझी आई..”
हेही वाचा…“सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि मी आमदारांच्या १५० बैठका घेतल्या,” आमदाराचा मोठा गोप्यस्फोट
हेही वाचा…“संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत..”, रूपाली पाटलांचा शिरसाठांवर हल्लाबोल
हेही वाचा…“वज्रमूठ महाविकास आघाडीची..! आघाडीच्या पहिल्या सभेचा थरकाप उडवणारा टिझर जारी, राजकारण तापणार ?
हेही वाचा…““आई आजारी होती तरी ती सगळ्या कार्यक्रमांना जात होती”, कुणाल टिळकांनी दाखवला चंद्रकांत पाटलांना ‘ग्राउंड रिझल्ट’