छत्रपती संभाजीनगर : वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संपुर्ण महाराष्ट्रभर भाजपकडून राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. यातच छत्रपती संभाजीनगर येथे देखील भाजपने राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं. परंतु कार्यकर्त्यांना आपण कशासाठी आलोय तेच माहिती नव्हतं. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा…“तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवावी,” भाजपचं चॅलेंज
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. त्यावेळी पत्रकारानी कार्यकर्त्यांना विचारलं असता, त्यांना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य सांगता आलं नाही. तोच व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे. त्यात अंधारे यांनी असं म्हटलंय की, नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, कुछ किया करो. कुछ किया करो. और कुछ ना ही कर सके तो अपना ही पाजामा फाड़ के फिर उसे सिया करो. पर कुछ किया करो. अस म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपला टोला हाणला आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राला पवार नावाची कीड”, पडळकरांची टिका, “गोप्याच्या बुडाला आग..”मिटकरींचा पलटवार
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. तसेच राज्यातील विधानसभा क्षेत्रात वीर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचीही घोषणा केली.
नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है
कुछ किया करो … कुछ किया करो…
और कुछ ना ही कर सके तो अपना ही पाजामा फाड़ के फिर उसे सिया करो… पर कुछ किया करो@ShivsenaUBTComm @SaamanaOnline @AUThackeray pic.twitter.com/aDY5rbz3ig— SushmaTai Andhare (@andharesushama) March 27, 2023
Read also
- हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
- हेही वाचा…आपला शैक्षणिक दर्जा काय, कर्तृत्व काय ? म्हणत काॅंग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, त्यात ‘मामू’ही केला उल्लेख
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारतील का?” एकनाथ शिंदेंचा सवाल
- हेही वाचा…“एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा अन् काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा”
- हेही वाचा…“कुत्रं भुकल्याशिवाय मालक भाकर टाकतं नाही, तसं पडळकरांचं..” राष्ट्रवादीची पडळकरांवर जहरी टिका