मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या विराट सभेतून भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत भाजपला निवडणुक घेण्याचं आवाहन दिलं आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“काल सधू अन् मधू भेटले, विराट सभा पाहून त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले”, राऊतांचा खोचक टोला
उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. मी त्यांना सांगू इच्छितो, आमचं बावनकुळे हे कुळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती ते कुळे तुम्ही बुडवलं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचं नाव बुडवत आहात. एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा आणि काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. नुसत्या सभेतूनच वल्गना करू नका. असंही बावनकुळे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की.. ” उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही दिला इशारा
तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. उद्धव ठाकरे यांना माझा प्रश्न आहे. ते मुख्यमंत्री असताना ५० वेळा तरी काॅंग्रेस पक्षाने स्वांतत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद का सोडले नाही? असा सवाल करीत काॅंग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगले असाही टोला हाणला.
हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि संजय दोघंही नौटंकी करत आहेत. एकदा तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तुम्ही काॅंग्रेस पक्षाकडे गेले. जर तुम्ही काॅंग्रेस पक्षाची साथ सोडली, तर संपुर्ण महाराष्ट्र तुमचं अभिनंदन करेल. मी सुद्धा ठाकरे यांचं अभिनंदन करेन असंही त्यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“कुत्रं भुकल्याशिवाय मालक भाकर टाकतं नाही, तसं पडळकरांचं..” राष्ट्रवादीची पडळकरांवर जहरी टिका
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवावी,” भाजपचं चॅलेंज
- हेही वाचा…“महाराष्ट्राला पवार नावाची कीड”, पडळकरांची टिका, “गोप्याच्या बुडाला आग..”मिटकरींचा पलटवार
- हेही वाचा…““हिमंत असेल तर खोक्यांवरून माझ्यासह उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा,” सुहास कांदे यांची मागणी
- हेही वाचा…“गेल्या वर्षी एक कांदा ५० खोक्याला विकला गेला,” उद्धव ठाकरेंचा सुहास कांद्यांवर निशाणा