मुंबई : कोण म्हणतयं कांद्याला भाव मिळाला नाही. कांद्याला भाव मिळाला. मागच्या वर्षी एक कांदा ५० खोक्यांना विकला गेला. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांना केला. त्यावर खोक्यांवरून माझ्यासह उद्धव ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुहास कांदे यांच्यासह आमदार रामदास कदम यांनी देखील केली आहे.
हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन
कालच्या मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावर खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या कॉंट्रॅंक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरे यांनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. पाटणकरांची चौकशी करण्याची मागणी करा. किती लोकांना फोन केले. किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापुर्वी याचा मी स्वत: साक्षीदार आहे. या कान्टॅ्क्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा. असंही सुहास कांदे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर
त्यानंतर रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासह माझी देखील नार्को टेस्ट करा, असा इशारा त्यांनी दिला आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं. त्यानंतर आता शिंदे आणि भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Read also
- हेही वाचा…“गेल्या वर्षी एक कांदा ५० खोक्याला विकला गेला,” उद्धव ठाकरेंचा सुहास कांद्यांवर निशाणा
- हेही वाचा…“काल सधू अन् मधू भेटले, विराट सभा पाहून त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले”, राऊतांचा खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय की.. ” उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही दिला इशारा
- हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका