मुंबई : सध्या देशात एव्हाना राज्यात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टिका टिप्पणी सुरू झाली. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुली ऑफर दिली आहे.
हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून पंतप्रधान मोदींनी पवारांचे अनेक वेळा कौतुक केले आहे. तसेच शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या, तरी २०२४ मध्ये पुन्हा एनडीए ची सत्ता येणार आहे. त्यामुळे नागालॅंडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे. असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक
दरम्यान, अलिकडेच झालेल्या नागालॅंडच्या विधानसभेत राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आले आहेत. तर रामदास आठवले यांच्या पक्षाला देखील याठिकाणी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी शरद पवार यांना खुली ऑफर दिली आहे.
Read also
- हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”
- हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”
- हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”
- हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”