नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावत जाहीर सभा होत आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात उर्दू भाषेतून पोस्टर लागले आहेत. यावरून राज्यातील भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उर्दू भाषेतील पोस्टरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक
मालेगावात अली जनाब उद्धव ठाकरे यांचे स्वागत आहे. अशा आशायचे बॅनेर लागले आहेत. त्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना अली जनाब शोभतंय का ? असा खोचक टोला हाणला आहे. तसेच “ठिक आहे. उर्दू एक भाषा आहे, त्यामुळे त्या भाषेत कुणी काही म्हटलं तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून आम्ही लांगूनचालनाच्या विरोधात आहोत. असंही फडणवीसांनी सांगितलं. परंतु ते राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत जाऊन लांगूनचालन करीत असतील तर त्यांचं उत्तर बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड
त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी देखील त्यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात त्या जनाबांना आधी सांभाळा. बाळासाहेबांचं आमच्यावर बारीक लक्ष आहे. आम्ही जे काम करत आहोत ते त्यांच्या प्रेरणेनेच करत आहोत. मुस्लीम मतदारांवरून भाजप बोलतेय. पण त्यांना मुस्लिमांची मतं नको असतात का ? मुस्लिम लोकही इथले नागरिक आहेत, तेही इथले मतदार आहेत. देशात २२ कोटी मुस्लीम नागरिक आहेत. त्यांच्याविषयी अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजं रोवण्यासारखं आहे. असही संजय राऊतांनी म्हटलंय.
Read also
- हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”
- हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”
- हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
- हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”