नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावत जाहीर सभा होत आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात उर्दू भाषेतून पोस्टर लागले आहेत. यावरून राज्यातील भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उर्दू भाषेतील पोस्टरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”
मालेगावात अली जनाब उद्धव ठाकरे यांचे स्वागत आहे. अशा आशायचे बॅनेर लागले आहेत. त्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना अली जनाब शोभतंय का ? असा खोचक टोला हाणला आहे. तसेच “ठिक आहे. उर्दू एक भाषा आहे, त्यामुळे त्या भाषेत कुणी काही म्हटलं तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून आम्ही लांगूनचालनाच्या विरोधात आहोत. असंही फडणवीसांनी सांगितलं. परंतु ते राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत जाऊन लांगूनचालन करीत असतील तर त्यांचं उत्तर बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…““तुम्हाला सत्ता हवी, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम नको”, अन् अजित पवार संतापले
तर भाजपने देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. एका बाजूला औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले, याचे स्वागत करणारे पण उद्धव ठाकरेच, आता मालेगावच्या सभेसाठी मताचा जोगवा मागण्यासाठी लाचार झालेले सुद्धा उद्धव ठाकरेच. असे बेगडी आणि दुटप्पी हिंदूत्व पांघरून तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही जनाब उद्धव ठाकरे असं म्हणत भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
एका बाजूला औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले याचे स्वागत करणारे पण श्री उद्धव ठाकरेच, आता मालेगावच्या सभेसाठी मताचा जोगवा मागण्यासाठी लाचार झालेले सुद्धा श्री उद्धव ठाकरेच. असे बेगडी आणि दुटप्पी हिंदुत्व पांघरून तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही जनाब उद्धव ठाकरे ! pic.twitter.com/FWa20OSMpH
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 25, 2023
Read also
- हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
- हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
- हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक
- हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा…उर्दूतील ठाकरेंच्या पोस्टवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, “अली जनाब उद्धव ठाकरे..”