मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन देशात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधकांना आणखी कमजोर करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. यातच काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“‘जोडे मारो’ प्रकरणावरून अजित पवार भडकले, फडणवीसांचा पलटवार, सभागृहात शांतता”
रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य व सर्वसामान्यांचे पाठबळ असलेला बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी तो आवाड दाबला जात नाही, हा इतिहास आहे. आज देशात अशा आवाजांना दाबण्याच्या प्रयत्नांचा अत्यंत निडर वृत्तीने आणि धैर्याने केला जाणारा सामना अत्यंत आशादायक असून हेच आवाज उद्याच्या सक्षम आणि सुरक्षित लोकशाहीची पायाभरणी करतील यात कुठलीही शंका नाही. असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल, गुढीपाडव्याच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून काॅंग्रेसने दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्यागृह सुरू केला आहे. या सत्यागृहात काॅंग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे, प्रियंका गांधी आणि इतर काॅंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. त्यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलचं गाजत आहेत. तर मुंबईत देखील सत्यागृह सुरू करण्यात आला आहे.
लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य व सर्वसामान्यांचे पाठबळ असलेला बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी तो आवाज दाबला जात नाही,हा इतिहास आहे.आज देशात अशा आवाजांना दाबण्याच्या प्रयत्नांचा अत्यंत निडर वृत्तीने आणि धैर्याने केला जाणारा सामना अत्यंत आशादायक असून… pic.twitter.com/fTEpLNjHpT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 26, 2023
Read also
- हेही वाचा…““तुम्हाला सत्ता हवी, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम नको”, अन् अजित पवार संतापले
- हेही वाचा…“मालेगावच्या सभेची शिंदे अन् भाजपला धास्ती, आम्हाला लोकं भाड्याने आणावी लागत नाही,” संजय राऊत
- हेही वाचा…“राहुल गाधींना एक दिवस अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये घाण्याला जुंपा,” एकनाथ शिंदेंची मागणी
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, मोदींबाबत केलेलं ते वक्तव्य भोवलं”
- हेही वाचा…“शिळ्या कढीला ऊत,” उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अरविंद सावंतांचा राज ठाकरेंवर निशाणा