मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने काल शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत अनेक किस्से सांगितले. यातच त्यांनी शिवसेनेतून का बाहेर पडलो. यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत. त्यावर आता खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
अरविदं सावंत म्हणाले की, शिळ्या कढीला ऊत आहे. जर तुम्हांला चिन्हामुळे वेदना होत असतील तर त्या कोणामुळे झाल्या. ते कायदेशीर होतं की बेकायदेशीर, कोणी हिसकावून घेतलं की न्यायिक होतं का ? नीतीमुल्यांना धरून होतं का ? कुठेही त्यांनी त्यास स्पर्थ केला नाही. वंदनीय हिंदूह्यदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राजसाहेब शिवसेना सोडून गेले होते, त्यानंतर पत्रकार निखिल वागळे यांनी शिवसेनाप्रमुखांची मुलाखत घेतली होती. त्यात स्वत: शिवसेनाप्रमुखांनी त्यांना नक्की काय हवे होते, त्यासाठी ते का अस करत होते ते सांगितले होते. ते पहा, उर्वरित दुसऱ्या घेण्याची गरजच नाही. असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
राज ठाकरे आपल्या सभेत म्हणाले की, मी शिवसेना सोडल्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार केला गेला. त्यामुळे मला काही गोष्टी सांगाव्या लागत आहेत. मी एकेदिवशी उद्धव सोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलं. मी हे जे सांगतोय ते शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे ? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे, सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय ? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस, कारण मी प्रचाराला बाहेर पडतो आणि नंतर दिसत नाही. लोकांना मला तोंड दाखवता येत नाही. मला सांग की मी नेमंक काय करायचं आहे? मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही. मी विचारलं ठरलं ना. तो म्हणाला हो ठरलं. असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.
Read also
- हेही वाचा…“‘जोडे मारो’ प्रकरणावरून अजित पवार भडकले, फडणवीसांचा पलटवार, सभागृहात शांतता”
- हेही वाचा…राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल, गुढीपाडव्याच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य
- हेही वाचा…राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारो आंदोलन, काॅंग्रेसकडून निषेध
- हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
- हेही वाचा…संसदेत ‘संजय राऊतांवर’ शिंदे गट मोठी कारवाई करण्याची शक्यता, थेट लोकसभा अध्यक्षांना पाठवलं पत्र