नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुख्यनेते पदावरून हकालपट्टी करा. अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यावर आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. यातच संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि खासदारांवर सातत्याने टिका करीत आहेत. त्यावरून आता संजय राऊत यावर काय प्रतिक्रिया देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
शिवसेनेच्या पक्षाची आज संसदेच्या कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर संजय राऊत यांना शिवसेनेच्या मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करावी. यावर चर्चा होऊन राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
त्याचबरोबर येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्याची पाहणी तसेच दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी शिंदे गटातील खासदारांची बैठक पार पडली. यावर त्यांनी चर्चा देखील केली आहे.
Read also
- हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया