पुणे : अलिकडेच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे आणि काॅंग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. भाजपचा २८ वर्षाचा बालेकिल्ला रवींद्र धंगेकर यांनी उध्दवस्त करत भाजपला जोरचा धक्का दिला. विधीमंडळात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सहभाग घेतला. यातच आता मी कसब्यात रमलोय, लोकसभेसाठी माझी कोणतीही तयारी नाही. असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
त्यांनी भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांच्याबाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, मी आणि दादांनी १५ वर्ष एकत्रित पुणे महापालिकेमध्ये काम केले आहे. तसेच हेमंत रासने यांना पुणे महापालिकेमध्ये चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अनुभव असल्याने आगामी काळात मतदार संघातील काम करतेवेळी निश्चित मला फायदा होणार आहे. मात्र लोकशाहीमध्ये जनता ठरवित असते. विजय आणि पराजय असतो आणि आपल्या खांद्यावर जी पताका असते. ती पुढे घेऊन जायची असते आणि मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही. पण समाजाची सेवा करीत राहणार असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं.
हेही वाचा…कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ”एकनाथ शिंदे” आयोध्या दौऱ्यावर, तारीख ही ठरली
मागील तीन दशक खासदार गिरीश बापट यांनी शहरात काम केले असून राजकीय स्तर कसा ठेवावा. हे आजच्या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मी खासदार गिरीश बापट यांचे धन्यवाद मानतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि त्याचा समतोल कसा राखला जाईल अस काम त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर मी गिरीश बापट यांच्या विरोधात दोन वेळेस विधानसभा निवडणुक लढवली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील त्याच पद्धतीने काम करीत राहणार. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
- हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
- हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
- हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका