मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अलिकडेच धमकीचा फोन आला होता. एका प्रकरणामध्ये डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरूणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी याप्रकरणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण
कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांनी अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची ऑफर आणि त्यानंतर दहा कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना आता समारोसमोर बसवून पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत.
हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं
मंगळीवारी न्यायालयाने अनिल आणि त्याचा नातेवाईक निर्मल यांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर अनिक्षा हिच्या पोलीस कोठडीत २४ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.अनिक्षा ही चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे सांगत, चार दिवसांत बऱ्याच गोष्टींचा तपास झाला असल्याचा दावा पोलीसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ
तक्रार दाखल केल्यानंतर बुकी अनिल जयसिंघानी गेल्या काही दिवसापासून फरार होता. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विशेष ऑपरेशन आखण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता तब्बल पाच दिवसानंतर गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा…कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ”एकनाथ शिंदे” आयोध्या दौऱ्यावर, तारीख ही ठरली
- हेही वाचा…“कसब्यात सध्या रमतोय, मग लोकसभा निवडणुकीचा विचार करू”, रवींद्र धंगेकरांचं सुचक विधान
- हेही वाचा…“खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही”, शिंदे गटातील आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर
- हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा
- हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा