मुंबई : आज संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुढीपाडव्याच्या दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला मराठीमधून शुभेच्छा दिल्या आहेत. तर राज्यात आज विविध भागात राज्यातील प्रमुख नेत्यांनी रॅली काढत गुढीपाडव्याच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा…““संजय राऊत ‘मातोश्रीची’ भाकरी खाऊन ‘पवारांची’ चाकरी करतात” दादा भुसेंच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या दिनानिमित्ताने मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “येणारे वर्ष समृद्धीचे आणि तुमच्या सर्व आशा आकांक्षांच्या पुर्तेतेचे जावो या शुभेच्छा, हा गुढी पाडवा सर्वांना आनंददायी जावो. असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा…पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, भास्कर जाधव विधीमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक
तर आज ठाण्यातील रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी, विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी. असं म्हणत गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असं म्हटलं आहे तर संपन्नतेची समृद्धीची, समाजाच्या सर्वांगीण विकासाची, गुढी उभारूया. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती”
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत ऋतुच्या आगमनासोबत होणारा गुढीपाडवा, येणारं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनातल्या आशा -आकांक्षा, मनातील सर्व स्वप्नं पुर्ण होवोत. नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो, जीवनातली यशाची गुढी आभाळात उंच जावो. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रवासियांना, मराठीप्रेमी बांधवांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा! मावळत्या वर्षातील आनंददायी आठवणी सोबत घेऊन नववर्षाचं स्वागत करुया. एकजूट होऊन सुखी, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवूया!#Gudhipadwa pic.twitter.com/LGXdLGcRhZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 22, 2023
गुढीपाडव्याच्या या मंगल प्रसंगी, आपणां सर्वांना माझ्या शुभेच्छा. pic.twitter.com/BDfKtXBvPO
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
Read also
- हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण
- हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं
- हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ
- हेही वाचा…दादा भुसेंनी राऊतांना चॅंलेज दिलं, त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..”पुन्हा निवडून येऊन..”
- हेही वाचा…“आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा”,दादा भुसे