मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या सभागृहात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात एकच गोंधळ बघायला मिळाला. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर टिका करतांना मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात अशी टिका केली. त्यावर अजित पवारांसह जयंत पाटील आणि इतर आमदारांनी यावर जोरदार आक्षेप घेत जोरदार प्रहार केला.
हेही वाचा…तयारीला लागा…! लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभेच्याही निवडणुकांचा धुराळा उडणार ?
खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळे बोलतांना त्यांनी संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टिका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही. असं स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा…“सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडाणी मेहुल चोक्सी, मोदी”, राऊतांची जहरी टिका
सभागृहात वक्तव्य केल्यानंतर दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी शरद पवार यांच्याविषयी काहीही चुक बोललो नाही. तुम्ही रेकॉर्ड तपासून पाहा. मी एवढचं म्हणालो की, हे जे महागद्दार आहेत, ते भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात. एवढचं मी बोललो. यामध्ये मी शरद पवार यांचा कोणत्याही चुकीच्या पद्धतीने उल्लेख केलेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी हे वक्तव्य तपासावे, त्यामध्ये काही अयोग्य आढळल्यास ते रेकॉर्डवरून काढून टाकावे, आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन आरोप खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. असं दादा भूसे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा अटकेत”, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,,
दरम्यान, दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार सभागृहात चांगलेच आक्रमक झालेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील दादा भुसे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला.
Read also
- हेही वाचा…पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, भास्कर जाधव विधीमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक
- हेही वाचा…“केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती”
- हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
- हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
- हेही वाचा…“मागण्या मान्य करा, अन्यथा..,” शेतकऱ्यांनी सरकारला दिला ४० दिवसांचा अल्टिमेटम, राजकारण तापणार