मुंबई : आपल्या देशात फक्त भाजपला सत्ता मिळावी, निवडणुका जिंकता याव्यात. यापलिकडे भाजप दुसरा विचार करत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचा विचार आहे. पण मुंबईसह राज्यातील १४ महानगरपालिकांच्या निवडणुका का रखडून ठेवल्या आहेत. ? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचा विचार सुरू आहे. त्यावर ते बोलत होते.
हेही वाचा…हक्कभंगाच्या नोटीशीला संजय राऊतांचं उत्तर, राऊतांनी डावच पलटवला, समितीचीच गोंधळात
भाजपचं एकमेव धोरण म्हणजे सत्ता आहे. सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडाणी मेहुल चोक्सी,नीरव मोदी यांना पाठीशी घालायचं. या धोरणानुसार चालत असेल तर त्यांच्या डोक्यात सत्ता आणि निवडणुकांशिवाय दुसरा विचार नसेल. तुम्ही निवडणुका कधीही घ्या, आम्ही त्यासाठी तयार आहोत. असंही संजय राऊतांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा आरोपीला गुजरातमध्ये अटक, पोलिसांकडून मोठी कारवाई”
दिल्लीची महानगरपालिकेची निवडणुक होऊ देत नव्हते. दिल्लीचा अर्थसंकल्प रोखला. तिथे लोकशाहीच्या माध्यमातून सरकार आलं आहे. भले ते भाजपला मान्य नसेल. पण लोकांनी निवडलेलं सरकार आहे. परंतु देशात अशा अनेक गोष्टी आहेत. त्या कधीही घडतांना दिसल्या नाहीत. एका उद्योगपतीसाठी भाजप आणि देश कसा कामाला लागला आहे. ते आपण पाहत आहोत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…““नाशिकचे प्रवीण अलई यांची भाजपच्या ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी निवड,” बावनकुळेंनी केली घोषणा
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही फक्त भाजपला कुणाला तरी विकत द्यायची आहे, म्हणून फार मोठा सौदा केला जातो. निवडणुक आयोगाचा वापर केला जातो अन् एका फुटलेल्या गटाकडे शिवसेना दिली जाते. हे पण इतिहासात कधी घडलं नव्हतं. लोकशाही संपली म्हणून टिका केली, म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांची सदस्यत्वच रद्द करावं अशी मागणी देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हती असा नाराजीचा सुर ही संजय राऊतांनी समाजमाध्यमांसमोर दाखवला.
Read also
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा अटकेत”, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,,
- हेही वाचा…“आमची अवस्था दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी,” महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे काय बोलून गेले ?
- हेही वाचा…“सावरकर समझा क्या…”, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली, टिका टिप्पणीत ट्विटवार
- हेही वाचा…संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर
- हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या आश्नासनानंतर संपकरी कर्मचाऱ्यांची तलवार म्यान, ७ दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय