मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्या मैदानावर सभा पार पडली होती. त्या दापोली येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा काल झाली. या सभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली. तर रामदास कदमांनी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्याला आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
प्रत्युत्तर देण्यासाठी खेड येथे सभा पार पडली. त्या सभेत रामदास कदम म्हणताहेत की, मी वाघ आहे. बाळासाहेबांनी वाघ पाळला. आता यांना इतकं तरी समजलं पाहिजे की, शेळ्या मेंढ्या पाळत असतात. वाघ पाळत नाहीत. तसेच वाघ रडतं असतं का? असा टोला हाणत, नुसतं झेंडू बॉम्ब लावून रामदास कदम रडत असतात. असा शाब्दिक टोलाही सुषमा अंधारेंनी रामदास कदम यांना लगावला.
हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे व्यासपीठावर असतांना त्यांच्यासमोरच ते म्हणातात, की बाळासाहेब मलाच मुख्यमंत्री करणार होते. त्याचबरोबर जर शिंदेसमोरच ते बोलत असतील तर शिंदेचं रामदास कदमांना जवळ ठेवणार नाहीत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा माती करून मीच इथंपर्यंत आलो आहे. तर मलाच कसं सांगतोय तु असा टोलाही त्यांनी हाणला.
Read also
- हेही वाचा….“ठाकरेंना सत्तेची भुरळ, म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वदवून घेतले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…““राज ठाकरेंपासून नारायण राणे, रामदास कदमांना तुम्ही संपवलं”, शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप
- हेही वाचा…“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद
- हेही वाचा…गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू
- हेही वाचा…“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका