मुंबई : राज्यात आगामी काळात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप युतीत शिंदे गटाला फक्त ४८ जागा देणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.यातच अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत
आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही, येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची? की नाही करायची? किती जागा देणार ? त्याचं अजून काहीही ठरलेलं नाही. आगामी काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, पुढच्याय दीड वर्षात काय होणार? हे काही आताच सांगता येत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले. तीन वेळा शपथविधी झाले. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? हे आताच सांगता येत नाही. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.
हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
दरम्यान, दापोली शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक दापोली नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने खेड गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे.
Read also
- हेही वाचा…“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका
- हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
- हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
- हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया
- हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा