मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज गुडीपाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यातच एका बॅनरने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नाही, भास्कर जाधव विधीमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक
दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसेच्या माहिम विधानसभा शाखेने राज ठाकरे यांचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री हिंदु जननायक राज ठाकरे असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ह्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती”
मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर्स दादरमधील शिवसेना भवनासमोर लावले आहेत. तसेच यावर हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो असून भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा फोटो आहे. तर खाली लक्ष्मण पाटील यांचाही फोटो आहे.
Read also
- हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं
- हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ
- हेही वाचा…दादा भुसेंनी राऊतांना चॅंलेज दिलं, त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..”पुन्हा निवडून येऊन..”
- हेही वाचा…“आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देईन, खोटे निघाले तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा”,दादा भुसे
- हेही वाचा…““संजय राऊत ‘मातोश्रीची’ भाकरी खाऊन ‘पवारांची’ चाकरी करतात” दादा भुसेंच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ