मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात आसाम राज्यातील गुवाहाटी येथील कामाख्या देवी चर्चेत आली होती. शिवसेनेविरोधात बंडाळी केल्यानंतर ४० बंडखोर आमदारांनी गुवाहाटी गाठली होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यातच आता एकनाथ शिंदे आयोध्या दौरा करणार आहे.
हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काही दिवसात आयोध्या दौरा करणार आहे. या दौऱ्याच्या वेळी ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर शरयू नदीवर गंगा आरती देखील करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील आमदार, खासदार उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. त्याआधी शिवसेनेतील काही नेते अयोध्या दौऱ्याची पाहणी करणार आहेत.
हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ६ एप्रिल रोजी अयोध्या दौरा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आधीच अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अयोध्या दौरा करणार आहेत.
Read also
- हेही वाचा…“कसब्यात सध्या रमतोय, मग लोकसभा निवडणुकीचा विचार करू”, रवींद्र धंगेकरांचं सुचक विधान
- हेही वाचा…“खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही”, शिंदे गटातील आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर
- हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा
- हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
- हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण