पुणे : अलिकडेच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे आणि काॅंग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. भाजपचा २८ वर्षाचा बालेकिल्ला रवींद्र धंगेकर यांनी उध्दवस्त करत भाजपला जोरचा धक्का दिला. विधीमंडळात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सहभाग घेतला. यातच आता मी कसब्यात रमलोय, लोकसभेसाठी माझी कोणतीही तयारी नाही. असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ
मागच्या आठवड्यात संपुर्ण पुणेकरांनी आनंदत्सोव साजरा केला. तसाच आज गुढीपाडव्याचा सण देशातील प्रत्येकजण करीत आहे. कालच विधानसभेत मी कसब्याच्या बाजूने बाजू मांडली. माझी पहिली मागणी होती की, पुणेकरांना ४० टक्के मिळली पाहिजे. त्यावर शासनाने निर्णय घेतला आहे, पंरतु तत्वात मान्य केला नाही. 1961 सालानंतर पुण्यात पुर आला अन् पुण्याची व्याप्ती वाढली. अनेक गाव, खेडे घेतलेत. त्यावर टॅक्स प्रचंड वाढला. त्यानंतर जजीया कर सारखा लोकांना भरावा लागला. त्यातच असे अनेक प्रश्न मांडलेत.
हेही वाचा…दादा भुसेंनी राऊतांना चॅंलेज दिलं, त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..”पुन्हा निवडून येऊन..”
आगामी काही काळात राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीबाबत काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेतील ते मला मान्य आहे. लोकसभेसाठी माझी कोणतीही तयारी नाही. यातच लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आहेत. तसेच कसब्यात पाच ते सहा रमतोय मी बघू. असंही धंगेकरांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“खुर्ची पळवणे यात शिंदे गटाचा हात कोणी पकडू शकत नाही”, शिंदे गटातील आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर
- हेही वाचा…“विधिमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कारवाई होणार”, राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा
- हेही वाचा…गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा
- हेही वाचा…“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री”, दादरमध्ये राज ठाकरेंचे लागले बॅनर्स, चर्चांना उधाण
- हेही वाचा…“राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’ असे बोलतात” शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, दादा भुसे प्रकरण तापलं