मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज गुडीपाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यातच एका बॅनरने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ”एकनाथ शिंदे” आयोध्या दौऱ्यावर, तारीख ही ठरली
राज ठाकरे यांचे बॅनर लागल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे मुख्यमंत्री झालेत तर कुणाला आवडणार नाहीत. आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात राज कधी येणार ? जेणेकरून जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्राला घडवायचं आहे आणि तो घडवावा. त्यासाठी माझ्यासारखे शिल्लेदार आहेत. निश्चितपणे त्यांच्या पाठीशी काल होते, आज आहेत आणि उद्याही राहणार. असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कसब्यात सध्या रमतोय, मग लोकसभा निवडणुकीचा विचार करू”, रवींद्र धंगेकरांचं सुचक विधान
राज ठाकरे यांचे दादरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. तर असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
- हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
- हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
- हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”