मुंबई : वीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जोरदार आंदोलन केलं. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला भाजपच्या काही आमदारांनी जोडे मारो आंदोलन करीत याचा निषेध केला. त्यावर आजा सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
सभागृहात अजित पवार म्हणाले की, विधीमंडळाच्या आवारात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची पंरपरा नाही. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधिमंडळाच्या कार्य क्षेत्रात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून विधानसभा अध्यक्षांनी व मुख्यमंत्र्यांनी तातडीनं पावलं उचलली पाहिजे. असं म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारला सुचना केली.
हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
अजित पवार यांनी भाष्य केल्यानंतर त्याला फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यावर ते म्हणाले की, वीर सावरकरांबद्दल चुकीचं बोलतात, त्याचा निषेध झाला पाहिजे. आम्ही त्याचा निषेध करतो. यासह विधिमंडळाच्या आवारात अशाप्रकारे जोडे मारो आंदोलन करू नये. मी सत्तारूड पक्षाच्या वतीने अध्यक्षांना अश्वस्त करतो की, अशाप्रकारे सभागृहाच्या आवारात कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही आणि ते योग्य नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा…राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल, गुढीपाडव्याच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य
- हेही वाचा…राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारो आंदोलन, काॅंग्रेसकडून निषेध
- हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
- हेही वाचा…संसदेत ‘संजय राऊतांवर’ शिंदे गट मोठी कारवाई करण्याची शक्यता, थेट लोकसभा अध्यक्षांना पाठवलं पत्र
- हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक