मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर देशभरात मोठा संतोष दिसून आला. देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरून भाजपवर जोरदार टिका केली. तर ठिकठिकाणी काॅंग्रेसच्या नेत्यांकडून आंदोलने, मोर्चेकाढून भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र राहुल गांधी यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.
हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे दैवत असून त्यांचा वांरवार अपमान करणारे काॅंग्रेसचे नेते राहुल गाधी यांना एक दिवस अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये घाण्याला जुंपा, अशी मागणीही त्यांनी केली. यातच शनिवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी आमदारांचे जोरदार समर्थन करतानाच राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्ये थांबवली नाहीत. तर त्यांना राज्यात फिरूही देणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा…संसदेत ‘संजय राऊतांवर’ शिंदे गट मोठी कारवाई करण्याची शक्यता, थेट लोकसभा अध्यक्षांना पाठवलं पत्र
संसदेतील सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला संसदेतून आजीवन अपात्र ठरविले किंवा तुरूंगवास झाला तरीही देशातील लोकशाहीचे रक्षण करत राहु असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर देशभरातून एव्हाना राज्यातील विरोधी पक्षातील आमदारांनी देखील राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
दरम्यान, लोकसभेतचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्दयावर काॅंग्रेस आज दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह करणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सत्यग्रह चालणार आहे. याचबरोबर संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही सर्व प्रदेशाध्यक्षांनाही दिल्लीतून कार्यक्रम तयार करून पाठवला आहे. सर्व राज्यधान्यांमध्येही दिल्लीच्या धर्तीवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.
Read also
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, मोदींबाबत केलेलं ते वक्तव्य भोवलं”
- हेही वाचा…“शिळ्या कढीला ऊत,” उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अरविंद सावंतांचा राज ठाकरेंवर निशाणा
- हेही वाचा…“‘जोडे मारो’ प्रकरणावरून अजित पवार भडकले, फडणवीसांचा पलटवार, सभागृहात शांतता”
- हेही वाचा…राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल, गुढीपाडव्याच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य
- हेही वाचा…राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारो आंदोलन, काॅंग्रेसकडून निषेध