नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांच्या जाहीर राज्यात होत आहेत. यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा अलिकडेच पार पडली. आता या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार ते पाहणं महत्वाचं आहे.
हेही वाचा…राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारो आंदोलन, काॅंग्रेसकडून निषेध
मालेगावच्या सभेसाठी शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतली आहे. तसेही ही सभा अशी आहे की या सभेला कुणी भाड्याने येणार नाही. 300 रूपये, 500 रूपये रोजानी जी माणसं आणली जातात अन् मग मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात. समोर कोण बोलतंय ते माहित नाही. आपण कशाकरीता आलोय ते माहिती नाही. अशी सभा ही नाही आहे. असा टोला खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच मालेगावच्या सभेची शिंदे आणि भाजपला धास्ती आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
त्याचबरोबर अनेक संस्थांना ह्या सभेसाठी सक्ती केली आहे. त्यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, मालेगावची सभा महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. आमची कुणालाच सक्ती नाही. उलट काही संस्थांनी सभेसाठी सुट्टा दिल्या आहेत. या सभेला शेतकरी, कष्टकरी, तरूणांना यावं. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उर्दूमध्ये पोस्टर लावण्यात आले. त्यावरून भाजपने टिका केली आहे. त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
दरम्यान, आपल्या देशात एखाद्या भाषेवर बंदी आहे का ? असा सवाल करीत कालचं मी जावेद अख्तरांचं फारच कौतुक केलं. शेवटी देशाच्या बाहेर जाऊन पाकिस्तानाला खडसावणं ही भाषा देखील उर्दू आहे. तसेच ह्या सभेला सर्व जातीधर्माचे लोक येतीलच. हा प्रकार आपलं सर्वाचं लक्ष भटकवण्याचा प्रकार आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा…“राहुल गाधींना एक दिवस अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये घाण्याला जुंपा,” एकनाथ शिंदेंची मागणी
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, मोदींबाबत केलेलं ते वक्तव्य भोवलं”
- हेही वाचा…“शिळ्या कढीला ऊत,” उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अरविंद सावंतांचा राज ठाकरेंवर निशाणा
- हेही वाचा…“‘जोडे मारो’ प्रकरणावरून अजित पवार भडकले, फडणवीसांचा पलटवार, सभागृहात शांतता”
- हेही वाचा…राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल, गुढीपाडव्याच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य