नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावत जाहीर सभा होत आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात उर्दू भाषेतून पोस्टर लागले आहेत. यावरून राज्यातील भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उर्दू भाषेतील पोस्टरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शिळ्या कढीला ऊत,” उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अरविंद सावंतांचा राज ठाकरेंवर निशाणा
मालेगावात अली जनाब उद्धव ठाकरे यांचे स्वागत आहे. अशा आशायचे बॅनेर लागले आहेत. त्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना अली जनाब शोभतंय का ? असा खोचक टोला हाणला आहे. तसेच “ठिक आहे. उर्दू एक भाषा आहे, त्यामुळे त्या भाषेत कुणी काही म्हटलं तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून आम्ही लांगूनचालनाच्या विरोधात आहोत. असंही फडणवीसांनी सांगितलं. परंतु ते राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत जाऊन लांगूनचालन करीत असतील तर त्यांचं उत्तर बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“‘जोडे मारो’ प्रकरणावरून अजित पवार भडकले, फडणवीसांचा पलटवार, सभागृहात शांतता”
आपल्या देशात एखाद्या भाषेवर बंदी आहे का ? असा सवाल करीत कालचं मी जावेद अख्तरांचं फारच कौतुक केलं. शेवटी देशाच्या बाहेर जाऊन पाकिस्तानाला खडसावणं ही भाषा देखील उर्दू आहे. तसेच ह्या सभेला सर्व जातीधर्माचे लोक येतीलच. हा प्रकार आपलं सर्वाचं लक्ष भटकवण्याचा प्रकार आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read also
- हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”
- हेही वाचा…““तुम्हाला सत्ता हवी, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम नको”, अन् अजित पवार संतापले
- हेही वाचा…“मालेगावच्या सभेची शिंदे अन् भाजपला धास्ती, आम्हाला लोकं भाड्याने आणावी लागत नाही,” संजय राऊत
- हेही वाचा…“राहुल गाधींना एक दिवस अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये घाण्याला जुंपा,” एकनाथ शिंदेंची मागणी
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, मोदींबाबत केलेलं ते वक्तव्य भोवलं”