मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन देशात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधकांना आणखी कमजोर करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. यातच काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावरून भाजपवर टिका केली आहे.
हेही वाचा…““तुम्हाला सत्ता हवी, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम नको”, अन् अजित पवार संतापले
सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. पण ही खेळी मोदींवर उलटणार. सभागृहातील बुलंद आवाज आता संपुर्ण देहभरात पोचणार. यापुढे मोदींची जाहीर गोची होणार. इतिहास साक्षीदार आहे, रस्त्यावरच्या लढाईत हुकूमशाहांचा पराभवच होतो.
हेही वाचा…“मालेगावच्या सभेची शिंदे अन् भाजपला धास्ती, आम्हाला लोकं भाड्याने आणावी लागत नाही,” संजय राऊत
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून काॅंग्रेसने दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्यागृह सुरू केला आहे. या सत्यागृहात काॅंग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे, प्रियंका गांधी आणि इतर काॅंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. त्यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलचं गाजत आहेत. तर मुंबईत देखील सत्यागृह सुरू करण्यात आला आहे.
सभागृहात मोदींची गोची होतेय म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. पण ही खेळी मोदींवर उलटणार. सभागृहातील बुलंद आवाज आता संपूर्ण देहभरात पोचणार. यापुढे मोदींची जाहीर गोची होणार. इतिहास साक्षीदार आहे, रस्त्यावरच्या लढाईत हुकूमशाहांचा पराभवच होतो. pic.twitter.com/6zt6Ejv4Ot
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 26, 2023
Read also
- हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
- हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक
- हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा…उर्दूतील ठाकरेंच्या पोस्टवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, “अली जनाब उद्धव ठाकरे..”
- हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”