मुंबई : महाराष्ट्राचा सत्तासंघर्षावरचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या निकालावरून पुढची राजकीय दिशा ठरणार आहे. यातच आगामी काही महिन्यात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत.
हेही वाचा…“मालेगावच्या सभेची शिंदे अन् भाजपला धास्ती, आम्हाला लोकं भाड्याने आणावी लागत नाही,” संजय राऊत
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्रिपुरा राज्यप्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी करत असल्याने शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र प्रसाद यांनी म्हटलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र प्रसाद यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ हेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा…“राहुल गाधींना एक दिवस अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये घाण्याला जुंपा,” एकनाथ शिंदेंची मागणी
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी केल्यानंतर त्यांच्यासोबत ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यातच आता महाराष्ट्र बाहेर राज्यांमध्ये देखील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्रिपुरा राज्यप्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी शिवसेनेत प्रवेश केला.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी करत असल्याने शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. pic.twitter.com/K3EAfJ8vVy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 25, 2023
Read also
- हेही वाचा…राहुल गांधींच्या कारवाईविरोधात काॅंग्रेसचं ”संकल्प सत्यागृह”, काॅंग्रेसचे नेते आक्रमक
- हेही वाचा…“नीरव मोदी, ललित मोदी हे माझ्यासारखे ओबीसी आहेत, हे ऐकून बरे वाटले” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा…उर्दूतील ठाकरेंच्या पोस्टवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, “अली जनाब उद्धव ठाकरे..”
- हेही वाचा…राहुल गांधीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची भाजपवर टिका, म्हणाले, “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य..”
- हेही वाचा…““तुम्हाला सत्ता हवी, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम नको”, अन् अजित पवार संतापले