नाशिक : राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं लोकांचं मनपरिवर्तन व्हायला वर्षानुवर्ष लागायचं. २० वर्षानंतर शिवसेनेची सत्ता आली. लोकांचं मनपरिवर्तन होण्यासाठी तेथील शेतकऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात राहावं लागतं. एक सभा घेतली म्हणजे सर्व काही झालं असं नाही होत. गर्जना देऊन कुणाचेही पोटं भरलेली नाही. त्यासाठी काम महत्वाचं आहे. असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”
सध्याच्या काळातील लोकांना सगळं समजायला लागलं आहे, ते इतकं मुर्ख राहिले नाहीत की एखाद्या पक्षाने झेंडा बदलला अन् दुसरा झेंडा तिथे लागला म्हणून लोकांचा प्रवाह तिथे वाहून जाईल इतके लोकं मुर्ख राहिलेले नाहीत. तसेच आपण आता नाशिकचा विषय काढला तर तिथे द्राक्ष, कांद्याचा प्रश्न आहे. तुम्हाला तिथे मंदिर, मजिदचा विषय काढून चालणार नाही. असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता आहे. हे त्यांनी अज्ञानातून केलं आहे. या अज्ञानपणामुळेच त्यांची सत्ता नेहमी जाते आणि भाजप फायदा घेते. मुळात मला जी शिक्षा सुनावली आहे ती दोन वेगवेगळ्या गुन्हांमध्ये आहे. त्यापैकी एक गुन्हा हा भारतीय दंड विधानाच्या कमल ५०४ अंतर्गत आहे, तर दुसरा भादंवि ३५३ या कलमाअंतर्गत आहे. एकाच गुन्हात दोन वर्षाची शिक्षा सुनावली असती तर मी अपात्र ठरलो असतो. दोन वेगवेगळ्या गुन्हांमध्ये शिक्षा असेल तर उमेदवार अपात्र ठरत नाही. असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांची मालेगावात विराट सभा होत आहे. या विराट सभेत उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार आहेत. ते पाहणं महत्वाचं आहे. तर सभेसाठी उद्धव ठाकरे आता नाशिकहून मालेगावला रवाना झाले आहे. तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त मालेगावात लावण्यात आला आहे.
Read also
- हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन
- हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर
- हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”
- हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”
- हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला