मुंबई : आगामी काही काळात राज्यात एव्हाना देशात निवडणकांचे वारे वाहणार आहेत. त्याची तयारी सध्या राज्यातील राजकीय पक्षांकडून जोरदार सुरू करण्यात आली आहे. यातच लोकसभेच्या निवडणुकीकरीता भाजपने बारामती मिशन ठेवलं आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांचे बारामती दौरे सुरू झाले आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना आवाहन दिलं आहे.
हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना विधानसभा निवडणुकीकरीता आव्हान दिलं आहे. जर माझं डिपॉझिट जप्त करायचं असेल तर अजित पवार माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला येतील. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार आणि त्यांच्या सरकारने जे काही दिलं नाही. ते सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याची टीका केली आहे.
हेही वाचा…“सत्तासंघर्षाच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राष्ट्रीय पातळीवर जोरदार हालचाली”
दरम्यान, आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये आमचाच विजय होईल. कारण आम्ही राज्यातील जनतेची कामं केली आहेत. त्यांना २०२४ मध्ये सगळ्या पक्षांना कळणार आहे की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Read also
- हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर
- हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”
- हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”
- हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”