मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजपने राहुल गांधींचा आंदोलनातून जाहीर निषेध व्यक्त केला. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा…““हिमंत असेल तर खोक्यांवरून माझ्यासह उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा,” सुहास कांदे यांची मागणी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. या पत्रकार परिषेदत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना स्क्रिप्टवरील मजुकर वाचण्यास विचारतांना दिसत आहेत. काॅंग्रेसने हा व्हिडीओ शेअर करीत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या व्हिडीओ मध्ये एकनाथ शिंदे फडणवीसांना वाचू का असं विचारत आहेत. त्यात वाचण्याची काहीच गरज नाही. असं म्हणतांना देवेंद्र फडणवीस दिसत आहे.
हेही वाचा…“गेल्या वर्षी एक कांदा ५० खोक्याला विकला गेला,” उद्धव ठाकरेंचा सुहास कांद्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ काॅंग्रेसने ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचान न करता मत ठोकून द्यायचं. वाचायची पण परमिशन घ्यावी लागते, मामूंना, आणि चालले राहुल गांधींना शिकवायला. असं म्हणत काॅंग्रेसने शिंदेंवर निशाणा साधलाय.
आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं…
वाचायची पण परमिशन घ्यावी लागते मामुंना, आणि चालले राहुल गांधीना शिकवायला 😂 pic.twitter.com/mGYLDbJi42
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 27, 2023
Read also
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारतील का?” एकनाथ शिंदेंचा सवाल
- हेही वाचा…“एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा अन् काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा”
- हेही वाचा…“कुत्रं भुकल्याशिवाय मालक भाकर टाकतं नाही, तसं पडळकरांचं..” राष्ट्रवादीची पडळकरांवर जहरी टिका
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवावी,” भाजपचं चॅलेंज
- हेही वाचा…“महाराष्ट्राला पवार नावाची कीड”, पडळकरांची टिका, “गोप्याच्या बुडाला आग..”मिटकरींचा पलटवार